वीरनारी | जागतिक महिला दिन विशेष कविता

स्त्री ही फक्त एक नातं नाही, ती संघर्ष, त्याग आणि धैर्याची जिवंत कहाणी आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त ही कविता देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरनारींना समर्पित 

वीरनारी


भूमिपुत्र लढले, लढताहेत कित्येक ते सीमेवरती,
सुरक्षित राहावे देशबांधव म्हणून देताहेत प्राणांची आहुती.
घडविण्यास वीरपुत्र अवतरली वीरनारी धरतीवरती,
            कधी असते आई, तर कधी सखी-सोबती.
बहाल केले बाळ अपुले, करण्या सेवा मातृभूमीची,
त्यागमूर्ती आहेस तू — वीरनारी,
वंदितो तुजला मनापासुनी.

सांभाळण्या संसार धैर्याने तू उभी राहते,
शव पतीचे येता घरी मन दुःखात बुडून जाते.

तरीही जगते प्रेमळ त्या आठवणींवरती,
काम पतीचे पुढे चालविण्या
पुढच्याच क्षणी तयार असते लढण्या सीमेवरती.

कृतज्ञतेने करतो सलाम
मातृभूमितील त्या वीरनारींना,
ज्यांच्या धैर्यामुळेच
अखंड उभा आहे देश हा आपला. 


— प्रतिक देवराज महाडिक

जर ही कविता तुम्हाला आवडली असेल, तर कृपया ती इतरांपर्यंत पोहोचवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

🌍 कोलकात्यातील Victoria Memorial Palace - इतिहास, सौंदर्य आणि माझा अविस्मरणीय अनुभव

कोलकाता डायरी – भाग २ हावडा ब्रिज आणि कोलकात्याची पहिली भटकंती

✈️ माझा पहिला विमानप्रवास: एका स्वप्नाची भरारी