कोलकाता डायरी – भाग २ हावडा ब्रिज आणि कोलकात्याची पहिली भटकंती
एअरपोर्टच्या बाहेर येताच माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी ओला कॅब बुक केली आणि आम्ही ठरलेल्या हॉटेलकडे निघालो. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काउंटरवर आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या - आधार कार्ड व इतर तपशील देऊन आम्ही रूमची चावी घेतली आणि खोलीत गेलो.
पाचतारांकित हॉटेलमधील रूम मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो.
खोली अतिशय आलिशान होती. आम्ही फ्रेश झालो आणि रूममध्येच जेवण ऑर्डर करून घेतलं. जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला. विमानाने प्रवास केल्यानंतर डोकं जड होतं, कधी कधी डोकेदुखीही होते - त्यामुळे थोडी विश्रांती आवश्यक होती.दुपारी
सुमारे तीन वाजता ज्या
कामासाठी आम्ही कोलकात्यात आलो होतो त्या
ऑफिसमधून कॉल आला. आम्ही
तयार झालो आणि खाली
आलो. ते लोक आम्हाला
घ्यायला हॉटेलसमोर आले होते.
त्यानंतर
पुढचे चार दिवस आमचं
साधं रूटीन सुरू झालं -
हॉटेल ते ऑफिस आणि ऑफिस ते हॉटेल.
हॉटेलमधील स्टाफ, जेवण आणि सर्व
सेवा अतिशय चांगल्या होत्या.
काही
दिवसांनंतर आमचा मुक्काम वाढवण्यात
आला आणि त्यामुळे हॉटेल
बदलण्यात आलं. ऑफिसजवळच एक
गेस्ट हाऊस होतं - जवळजवळ
हॉटेलसारखंच. तिथे आम्ही शिफ्ट
झालो.
त्या
गेस्ट हाऊसमध्ये दोन केअरटेकर होते
-
एक सुमारे साठ वर्षांचे आजोबा
आणि दुसरे चाळीस वर्षांच्या आसपासचे गृहस्थ.
ते आजोबा नेहमी बंगालीमध्ये आमच्याशी बोलत. सकाळी ते हसत हसत
विचारायचे -
“चाय खाबे?”
म्हणजेच, चहा घ्याल का?
दुसरे
केअरटेकर रोज सकाळी आमच्यासाठी
नाश्ता बनवत असत -
चहा, ब्रेड-बटर, पोहे - जे
हवं ते.
पण सुरुवातीच्या काही दिवसांत बंगाली
मसाले आणि जेवण आम्हाला
फारसं जुळलं नाही. त्यामुळे आम्ही बहुतेक वेळा चहा, ब्रेड-बटर आणि ऑम्लेटच
घेत असू.
माझ्या
वरिष्ठ सहकाऱ्यांना या सगळ्याचा आधीच
अनुभव होता. ते गेली पंचवीस
वर्षे या क्षेत्रात काम
करत आहेत. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मला खूप समजून
घेतलं आणि मार्गदर्शन केलं.
काम
सुरू होतंच, पण पहिल्या आठवड्याच्या
शेवटी आम्ही ठरवलं -
कोलकात्यात आलो आहोत तर थोडी भटकंती करायला हवी.
म्हणून
आम्ही सर्वप्रथम गेलो हावडा ब्रिज पाहायला.
हा ब्रिज मी फक्त पुस्तकांमध्ये
आणि व्हिडिओमध्ये पाहिला होता. गंगा नदीवर बांधलेला
भारतातील एक भव्य पूल.
सकाळी
आम्ही तिथे पोहोचलो. पण
त्या दिवशी जवळच एक राजकीय
कार्यक्रम होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी, ज्यांना तिथे सगळे “दिदी”
म्हणतात, त्यांचा कार्यक्रम होता.
त्यामुळे
परिसरात प्रचंड गर्दी होती. लोक “जय बांगला” अशा घोषणा देत
होते.
गर्दीतून
मार्ग काढत आम्ही अखेर
ब्रिजवर पोहोचलो.
हावडा ब्रिज अतिशय मोठा आहे. तो पायी चालत पार करायला साधारण १५ मिनिटे लागतात. त्याचं बांधकामही खूप वेगळं आहे. आजकालच्या अनेक पुलांप्रमाणे नदीमध्ये मधे मधे सपोर्ट नाहीत. पूर्णपणे आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगवर आधारित रचना आहे.
मी
Mechanical Engineering शिकलेलो
असल्यामुळे हा ब्रिज पाहताना
मला कॉलेजमध्ये शिकलेला एक विषय आठवला
- Cantilever Beam. Strength of Materials (SOM) या विषयात आपण
Cantilever संरचना कशी काम करते
हे शिकतो. या प्रकारात बीमचा
एक भाग मजबूत आधारावर
(fixed support) बसवलेला
असतो आणि दुसरा भाग
हवेत पुढे वाढलेला असतो.
हावडा ब्रिजची रचना देखील याच तत्त्वावर आधारित आहे. दोन्ही बाजूंनी मोठे Cantilever arms पुढे येतात आणि मधला भाग त्यावर आधारलेला असतो. त्यामुळे नदीमध्ये मधे मधे खांब उभारण्याची गरज पडत नाही. त्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर अशी रचना उभी करणे ही खरोखरच एक अभियांत्रिकी किमया वाटते.
प्रत्यक्ष
पाहताना तो खूप भव्य
आणि सुंदर वाटतो.
ब्रिज
पार केल्यानंतर आम्ही खाली घाटाजवळ गेलो.
तिथे पर्यटकांसाठी फेरीबोट्स असतात. आम्ही ठरवलं की नदीतून थोडी
सफर करायची.
नदीतून
सफर करताना खूप छान अनुभव
आला. हीच ती गंगा
नदी जी हिमालयातून वाहत
येते. नदी प्रचंड मोठी
आहे. बोटीमधून वर पाहिलेला हावडा
ब्रिज खूपच सुंदर दिसत
होता.
सफर
संपल्यानंतर आम्ही परत जाण्याचा विचार
केला. पण बाहेर प्रचंड
गर्दी होती. राजकीय कार्यक्रमामुळे लोक बसने मोठ्या
संख्येने येत होते.
म्हणून
आम्ही चालत चालत पुढे
गेलो. जवळच
Howrah Railway Station
होतं - भारतातील एक मोठं आणि
गजबजलेलं रेल्वे स्टेशन.
आम्ही
तिथेच दुपारचं जेवण करायचं ठरवलं
होतं. पण लोकांची इतकी
गर्दी होती की शेवटी
आम्ही तो निर्णय बदलला
आणि परत आमच्या भागात
जाऊनच जेवायचं ठरवलं.
परतताना
आम्ही बसने जाण्याचा निर्णय
घेतला.
बंगाली
भाषा आम्हाला येत नव्हती. त्यामुळे
मोडक्या-तोडक्या हिंदी-बंगालीत आम्ही विचारत होतो —
“दादा, ये गाड़ी किधर जायेगी?”
माझ्या
सोबतचे सर आधी तिथे
राहिले असल्यामुळे त्यांना थोडी भाषा येत
होती.
बसही
महाराष्ट्रातील बससारख्या नव्हत्या. कंडक्टरही वेगळ्या प्रकारचे होते. काही कंडक्टर तर
कोणत्याही युनिफॉर्ममध्ये नव्हते - साध्या शर्ट-पॅंटमध्येच.
त्यांनी
भाडं सांगितलं — ४०–६० रुपये.
आम्ही
पैसे दिले आणि पुढच्या
सीटवर बसलो.
लोक
येत होते, उतरून जात होते. तेवढ्यात
एक १८–१९ वर्षांचा
तरुण बसमध्ये चढला. त्याच्या हातात काही धार्मिक वाद्य,
देवीचा फोटो, लांब केसांची वेणी,
अंगावर कपडे नाहीत - फक्त
कमरेला काहीतरी गुंडाळलेलं.
तो पाहून माझ्या मनात विचार आला
-
आजही आपल्या देशात, मग तो महाराष्ट्र
असो किंवा बंगाल, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली सीमारेषा अजूनही स्पष्ट नाही.
शिकण्याच्या
वयात ही मुलं काय
करत असतील? आणि यासाठी जबाबदार
कोण?
काही
वेळात आम्ही आमच्या भागात पोहोचलो. त्या भागाचं नाव
होतं CA Island -
अतिशय व्यवस्थित आणि विकसित परिसर.
तिथे
एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि
नंतर गेस्ट हाऊसवर जाऊन आराम केला.
पण माझ्या डोक्यात एकच विचार फिरत
होता -
इतका
प्रचंड मोठा हावडा ब्रिज त्या काळात नेमका कसा बांधला असेल?
पुढील भागात…
कोलकात्यातील
आणखी एक ऐतिहासिक ठिकाण
-
Victoria Memorial
तिथला
अनुभव पुढील भागात…
👉 कोलकाता डायरी – भाग १ वाचण्यासाठी https://www.pratikmahadik.com/2026/03/blog-post_11.html#more येथे क्लिक करा.
– Pratik Mahadik




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा