कविता आणि कथा संग्रह

 

🌸 कविता (Poems)


1. कधी कधी शब्द बोलत नाहीत…

2. थांबलेले क्षण

3. स्वप्न सत्यात


📖 कथा (Stories)


1. शेवटचा ऑफलाइन दिवस

2. गावातील कवड्याचं रहस्य

3. गाव, डिगी आणि गीरा

4. ओवलीचं झाड आणि संचितची रहस्यपूर्ण रात्र

5. बालपणाची अविस्मरणीय खेळांची दुनिया

6. गावातील रहस्यमय घोरपडाचे झाड

7. गावातील शिमगा उत्सव

8. मळकंडी आणि गूढ

9. बारकोंबडा: निसर्ग आणि इतिहासाचे एक अद्वितीय रत्न

10. वडाची बावडी

11. स्मशानभूमी

12. एक लहान मुलगा

13. Whispers in the Dark

14. कथा: गावातील अनुभव



!!कधी कधी शब्द बोलत नाहीत… मग ते कविता होतात.!!


जिवनाचा संघर्ष आता रोजचा विधी झाला आहे,

क्षणभर विश्रांतीसाठीही माणूस तहानलेला आहे...

मनात काही स्वप्नं अजूनही धूसर उमटतात,

पण डोळे रोज वास्तवाच्या धुक्यात अडकतात...

मोकळं आभाळ कधी अंगावर घेतलं नाही

पावसात चिंब भिजून कविता लिहिलीच नाही...

जगण्यासाठी धावतोय, हे खोटं नाही,

पण जगण्यात 'मी' कुठे आहे, हे कळतच नाही...

कधीकधी वाटतं थांबावं क्षणभर,

श्वास घेऊन पहावं जीवनाचं खरं रूप...

पण जिवनाच्या ओझ्याखाली दबलेलं स्वप्न

हसण्याआधीच गहिवरून जातं, शांत..

पण एका सांजवेळी स्वतःशी गप्पा झाल्या,

मनाच्या एका कोपऱ्यात जुनी स्वप्नं जागी झाली…

त्या विसरलेल्या गाण्याची हळुवार चाल

मनाच्या शिळा संगीतातून पुन्हा निघाली…

आता ठरवलंय — दिवस थोडा स्वतःसाठी हवा,

नसतील भव्य स्वप्नं, पण समाधानातला दिवा हवा…

हळूहळू जरी चाललो, तरी थांबणार नाही,

क्षणभर का होईना — पण स्वतःस हरवू देणार नाही...

फुलं उमलतात जरी खडकात,

तसं काहीतरी उमलू दे माझ्यात...

आयुष्य असो कितीही कठीण,

एक गाणं तरी रोज स्वतःसाठी गाऊन बघीन…

©प्रतिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✈️ माझा पहिला विमानप्रवास: एका स्वप्नाची भरारी

कोलकाता डायरी – भाग २ हावडा ब्रिज आणि कोलकात्याची पहिली भटकंती